गणपतीबाप्पा आले घरा…

September 11, 2010 9:51 AM0 commentsViews: 3

11 सप्टेंबर

संपूर्ण राज्यभरासह आज देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह साजरा होत आहे.

आज मुंबईत लालबागचा राजा आणि पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी लोकांनी प्रचंड रांगा लावल्या आहेत. तर पुण्यात अगदी पारंपरिक पद्धतीने गणरायांची मिरवणूक काढण्यात आली.

पुण्यातील भाऊ रंगारी गणपती हा देशातील सर्वात पहिला गणपती मानला जातो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याअगोदर एक वर्षाआधीच भाऊ रंगारी मंडळाची प्रतिष्ठापना झाली होती.

रंगबिरंगी वेशभूषा करून तरुणमंडळी मिरवणुकीत सहभागी झाली होती.

व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बटनावर क्लिक करा…

close