विलासरावांच्या मुंबईतील घरात गणपती

September 11, 2010 12:41 PM0 commentsViews: 4

11 सप्टेंबर

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांच्याही घरी आज गणपतीची पूजा झाली. विलासरावांनी सपत्निक ही पूजा केली. दिल्लीला घर मिळाले असले तरीही विलासरावांनी मुंबईतीलच आपल्या घरी गणपती बसवला आहे.

त्यामुळे, विलासरावांचे मुंबईवरील प्रेम आजही आटले नसल्याचे दिसून आले आहे. विलासरावांसोबत त्यांचा अभिनेता मुलगा रितेश देशमुखही हजर होता.

संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र येऊन हा सण साजरा करत असल्याचा आनंद आहे, असे विलासरावांनी म्हटले आहे. आज ईद आणि गणेशोत्सव एकत्र येण्यामागे हिंदू मुस्लिम एकता अखंड राहावी हाच उद्देश असावा, असेही ते म्हणाले.

close