म. फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पवारांना कृषी रत्न पुरस्कारानं गौरवलं

October 26, 2008 12:10 PM0 commentsViews: 5

अहमदनगरमध्ये झालेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 25 व्या पदवीदान समारंभात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना कृषी रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. तसंच विद्यार्थ्यांनाही यावेळी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.राज्यपाल एस.सी.जमिर यांनी पवारांना हा पुरस्कार प्रदान केला. राज्यातील सर्व सिंचन स्त्रोतांचा विकास झाला तरी 70 टक्के महाराष्ट्र कोरडवाहूच आहे. या भागातील पिकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी नवे कृषी तंत्रज्ञान विकसीत करण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचं कृषी मंत्री शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

close