दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

September 12, 2010 1:07 PM0 commentsViews: 2

12 सप्टेंबर

संपूर्ण राज्यभरासह रवीवारी सगळ्यांच्या आवडत्या बाप्पाचं घरोघरी आगमन झाले आहे. तर दुसरीकडे आज दिड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होत आहे.

मुंबईतील दादर,जुहू ,गिरगाव,चौपाटीवर सध्या गणेश विसर्जनासाठी भाविक येऊ लागले आहे. अनेक ठिकाणी घरगुती गणपतींचं दीड दिवसात विसर्जन केले जात आहे.

काल वाजत गाजत जोरदार आगमन झालेल्या बाप्पांना भाविक निरोप देत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत गणेशभक्त बाप्पांना निरोप देत आहे.

यामध्ये दीड दिवसांच्या गणपतींमध्ये घरगुती गणपतींचं प्रमाण जास्त असते बहुतेक ठिकाणी कृत्रिम तलावही उभारण्यात आले आहे.

पुण्यात बाप्पाला निरोप

पुण्यातील एस.एम.जोशी पुलाच्या खालच्या घाटावर मुठा नदीच्या किणाार्‍यावर बाप्पाला निरोप देण्यास गर्दी केली आहे.

गणेश भक्त नदीच्या पात्रात उतरु नये याची खबरदारी घेतली जात आहे. यासाठी अग्निशमन दलाचे जवान कार्यरीत आहे.

close