लॅक्मे फॅशन वीकपासून बॉलीवूड दूर

October 26, 2008 2:13 PM0 commentsViews: 18

26 ऑक्टोबर मुंबईमुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये स्प्रिंगसमर कलेक्शनची धूम यंदा जोरदार होती. तरीही बॉलिवूड स्टार आणि ग्लॅमरपासून यंदाचा लॅक्मे फॅशन शो लांबच राहिला. लॅक्मे फॅशन शो सुंदर मॉडेल्स, नामांकित डिझायनर आणि त्यांच्या कलेक्शनसाठी प्रसिद्ध आहे. दिल्लीतील दोन मोठ्या फॅशन शोज्‌नंतर लगेचच मुंबईत लॅक्मे फॅशनवीकची धूम सुरू झाली. पाच दिवस चालणार्‍या या लॅकमे स्प्रिंग समर कलेक्शन फॅशन वीकमध्ये 75 डिझायनर्संनी यावेळेस पाश्चिमात्य कपड्यांना पारंपारिक टचमध्ये सादर करण्यात आलं. नेहमीच चर्चेत असणार्‍या लॅक्मे फॅशन वीकला यावेळेस मात्र ग्लॅमर आणि बॉलिवूड टच फारसा दिसला नाही. प्रियांका चोप्रा,अनिल कपूर आणि नावीन्य म्हणून श्रीसंत यांच्या व्यतिरिक्त एकही मोठं नाव या फॅशन वीकमध्ये नव्हतं.यावेळेचा फॅशन वीक जरी ठंडा असला तरी डिझायनर अर्जुन खन्ना, विक्रम फडणीस आणि सब्यसाची यांच्या धमाकेदार फॅशन शोमुळे फॅशनप्रेमींचा मूड मात्र चेंज झाला.

close