औरंगाबादमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

September 12, 2010 1:47 PM0 commentsViews: 7

12 सप्टेंबर

औरंगाबाद इथल्या शासकीय अभियांत्रिकी शाखेतील एका विद्यार्थ्याने होस्टेलच्या रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

तुकाराम चिंचोले असं या विद्यार्थ्याचे नाव असून तो इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षाला शिकत होता.

प्राध्यापकांच्या छऴाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तुकारामनं आपल्या मृत्युपुर्वी चिठ्ठीत लिहून ठेवल आहे. यामुळे क्रांती चौक पोलीस स्टेशनसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले.

महाविद्यालयातील प्राध्यापकांविरुध्द अनेक तक्रारी असल्याचंही विद्यार्थ्याचं म्हणणे आहे. तुकारामला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या प्रवीण रेवणकर या प्राध्यापकाला अटक झालीच पाहिजे यासाठी क्रांती चौक पोलीस स्टेशनसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले.

यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी प्रवीण रेवणकरचा पुतळाही जाळला. दरम्यान पोलिसांनी या प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर त्याला अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

close