‘प्रदेशाध्यक्षपदाची निवडणुक चुरशीची होणार’

September 12, 2010 2:18 PM0 commentsViews: 1

12 सप्टेंबर

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची निवडणुक चुरशाचीच होणार असे स्पष्ट व्यक्तव्य केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी केले आहे.

आणि राज्याच्या राजकारणात रस आहे असे जाहीर करुन टाकले आहे त्यामुळे या निवडणुकीत विलासराव देशमुख यांचे पारडे जड होणार हे नक्की झाले.

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाच्या निवडीबाबतची राज्यातल्या नेत्यांची बैठक रवीवारी दुपारी टिळक भवन इथे पार पडली. अध्यक्षपदाची ही निवडणूक बिनविरोध करण्याचा काँग्रेस श्रेष्ठींचा प्रयत्न आहे.

त्याचाच भाग म्हणून प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव उद्या प्रांतिक प्रतिनीधी मंजूर करणार आहेत.

त्यानंतर सर्व सहमतीने प्रदेशाध्यक्षा पदाच्या नावावर सोनिया गांधी शिक्कामोर्तब करतील. रवीवारच्या या बैठकीला माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, नारायण राणे, पंतगंराव कदम हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते हजर होते.

आगामी प्र्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणूकीत अनेक उमेदवार असू शकतात अस केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी म्हटलेआहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल अस ही ते म्हणाले आहे.

close