सलमान सापडला नव्या वादात

September 12, 2010 5:01 PM0 commentsViews: 5

12 सप्टेंबर

दबंगच्या प्रमोशनमुळे आणि त्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. पण 26 /11 च्या हल्ल्याबाबतच्या एका वक्तव्यामुळे सलमान वादात सापडला आहे.

26 /11 च्या हल्ल्यात श्रीमंत वर्गातील लोकांना लक्ष्य करण्यात आल्यामुळेच या हल्ल्याला जास्त प्रसिद्धी मिळाली असं वक्तव्य सलमानने एका पाकिस्तानी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

तसेच या हल्ल्यामागे पाकिस्तान सरकारचा हात होता असे आपल्याला वाटत नाही, असेही सलमानने म्हटले आहे. या वक्तव्यावर गदरोळ झाल्यावर रवीवारी सलमान खानने जाहिर माफी ही मागितली आहे.

या मुलाखतीत सलमान खानचं वक्तव्य

26/11 च्या हल्ल्यात उच्च वर्गातील लोकांवर हल्ला झाल्यानंचत्याला

जास्त प्रसिद्धी मिळाली.

याआधी रेल्वे आणि छोट्या शहरांमध्ये हल्ले झालेत पण त्याबद्दल

कोणीही बोलत नाही.

या हल्ल्याबद्दल जास्त चर्चा झाली कारण हे हल्ले ताज आणि ओबेरॉय

हॉटेल्सवर करण्यातआले होते.

आपली सुरक्षाव्यवस्था अपयशी ठरल्यानंच हा हल्ला झाला. सगळ्यांना

माहिती आहे.

या हल्ल्यामागे पाकिस्तान सरकारचा हात नव्हता, हा अतिरेकी

हल्ला होता.

सरकार म्हणते माफी मागावी

दरम्यान 26/11च्या हल्ल्याच्या खटल्यात सरकारची बाजू मांडणार्‍या उज्ज्वल निकम यांनीही सलमाननं माफी मागावी अशी मागणी केली आहे.

तर हा हल्ला देशावर झाला होता, फक्त ताज आणि ओबेरॉयच नाही तर सीएसटी स्टेशनलाही अतिरेक्यांनी लक्ष्य केलं या शब्दात मुख्यमंत्र्यांनीही सलमानवर टीका केली आहे.

वक्तव्य शहीदांचा अपमान- संजय राऊत

26/11 चा हल्ला ताज आणि ओबेरॉय हॉटेल्सवर नव्हता देशाच्या सार्वभौमत्वावर होता. या हल्यात सर्व सामान्याचा बळी गेला आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनलवर काय अंबानी राहत नाही, कामालेन मध्ये रतन टाटा राहत नाही, यात सर्वसामान्याचा बळी गेला आहे. सलमानने शहीदांचा अपमान केला आहे. सलमानने माफी मागावी असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

सलमानला राज'श्रय'

तर दुसरीकडे राज ठाकरेंनी मात्र सलमानच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. मुंबईत इतर ठिकाणी बॉम्बस्फोट झाले तेव्हा कॅडल मार्च का काढण्यात आले नाही असा सवालही राज ठाकरेंनी विचारला.

वांद्रे इथं आज राज ठाकरे यांनी सलमान खानचा दबंग सिनेमा पाहिला. दबंग सिनेमा आपल्याला आवडल्याची प्रतिक्रिया यावेळी राज ठाकरेंनी दिली.

close