उदगीरच्या नगराध्यक्षांची चौकशी

September 13, 2010 9:53 AM0 commentsViews: 1

13 सप्टेंबर

जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणी एटीएसने उदगीरच्या नगराध्यक्षा सय्यद बली गाबी यांची चौकशी केली आहे.

गाबी यांच्या मालकीच्या ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्ये बाँबस्फोटाचा कट शिजला होता. त्यासंदर्भात ही चौकशी झाली आहे.

बाँब स्फोटाचा मुख्य सूत्रधार हिमायत बेग याने याच कॅफेत स्फोटाचा कट रचला होता, अशी माहिती एटीएसने दिली होती.

दरम्यान नगराध्यक्ष गाबी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

close