खड्‌ड्यांमुळे बाप्पांच्या वाटेत विघ्न

September 13, 2010 10:03 AM0 commentsViews: 1

13 सप्टेंबर

मुंबईतील खड्‌ड्यांमुळे गणपती बाप्पांच्या मार्गात विघ्न निर्माण झाले आहे. बाप्पांच्या आगमनापूर्वी खड्डे बुजवण्याचे महापालिकेचे आश्वासन होते.

पण खड्डे तसेच राहिल्याने गणेशोत्सव समन्वय समितीने कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल आता सगळीकडूनच महापालिकेवर टीका होऊ लागली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करत आता गणेश विसर्जनापूर्वी रस्ते दुरूस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

त्याअंतर्गत काही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आल्याने कोर्टात जाणार नसल्याचे समन्वय समितीने सांगितले आहे.

close