सुशीलकुमारने रचला इतिहास

September 13, 2010 10:12 AM0 commentsViews: 5

13 सप्टेंबर

भारताचा ऑलिम्पिक मेडल विजेता कुस्तीपटू सुशीलकुमारने इतिहास रचला आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुशील कुमारने गोल्ड मेडल जिंकले आहे. 66 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये त्याने रशियाच्या गोगाएव ऍलनचा पराभव करत गोल्ड मेडल पटकावले आहे.

अशी कामगिरी करणारा तो पहिला सीनिअर कुस्तीपटू ठरलाय. सुशील कुमारने गोगाएव्हचा 3-1 असा सहज पराभव केला.

close