काजोलला झाला मुलगा

September 13, 2010 10:18 AM0 commentsViews: 21

13 सप्टेंबर

काजोल आणि अजय देवगण या दाम्पत्याला आज पुत्ररत्न झाले. सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी काजोलने बाळाला जन्म दिला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळ आणि काजोल अगदी सुखरूप आहेत.

काजोल, अजय देवगण आणि तिची पहिली मुलगी न्यासा यांच्या फॅमिलित आता या नवीन बाळाचीसुध्दा एंट्री झाली आहे. काजोलने नुकताच वी आर फॅमिली हा सिनेमा केला होता.

काजोलला पुत्ररत्न झाल्यामुळे वी आर फॅमिली हे नाव आता सार्थ ठरले आहे. आणि ही आनंदाची बातमी अभिनेता शाहरूख खानमुळे सगळ्यांना कळली. शाहरूखने ट्विट्‌रवर काजोलला मुलगा झाल्याची माहिती दिली आहे.

काजोलला मुलगा झाल्याने आपल्याला खूप आनंद झाल्याचेही शाहरूखने ट्विट केले आहे.

close