काश्मीरमधील सैन्याच्या विशेषाधिकारासाठी बैठक

September 13, 2010 10:20 AM0 commentsViews:

3 सप्टेंबर

जम्मू-काश्मीरच्या काही भागातून सैन्याचे विशेषाधिकार काढून घ्यावेत का, या महत्त्वाच्या आणि संवदेनशील विषयावर आज केंद्रीय स्तरावर बैठक होत आहे.

केंद्रीय सुरक्षा समितीची पंतप्रधानांबरोबर ही बैठक होत आहेत. काश्मीरमध्ये सध्या भडकलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला खूपच महत्त्व आले आहे.

कारण काश्मीरमध्ये विरोधकांसोबतच अनेक संघटनाही याबाबतीत आग्रही होत्या. मात्र भाजपने सरकारच्या या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे.

असे आहेत लष्कराचे विशेष अधिकार

- कायद्याचे उल्लंघन होत असल्यास, कुणाही व्यक्तीविरूध्द बळाचा वापर आणि गोळीबार करण्याची परवानगी

- पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी

- गरज वाटल्यास कुणालाही विना वॉरंट अटकेचा अधिकार

- अटक करण्यासाठी केव्हाही आणि कुठेही प्रवेशाचा अधिकार

- कारवाईसाठी लष्करी अधिकार्‍यांना कायद्याचे संरक्षण

close