गरीब पेशंटसाठी मानव सेवा केंद्राची संजीवनी

September 13, 2010 10:30 AM0 commentsViews: 7

दीप्ती राऊत, नाशिक

13 सप्टेंबर

औषधांच्या वाढत्या किंमती आणि उपचारांचा महागडा खर्च… आजही आरोग्यसेवा अनेकांना परवडणारी नाही… अशांसाठी नाशिकचे मानव सेवा केंद्र संजीवनी ठरले आहे.

महिन्याला फक्त 10 रुपये वर्गणीतून त्यांनी शेकडो पेशंटना जीवन दिले आहे. फक्त 10 रुपये प्रति महिना घेऊन कामगारांच्या मदतीतून मायको एम्प्लॉईज फोरमने मानव सेवा केंद्राची स्थापना केली.

गरीबांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हा एकमेव उद्देश. मोठ्या ऑपरेशन्ससाठी पेशंटना मुंबईत घेऊन जाण्यापासून संस्थेच्या कामाची सुरुवात झाली. पुढे त्या ऑपरेशनना आर्थिक मदत, औषधे, साधने… संस्थेचे काम वाढतच गेले.

गेल्या 20 वर्षात या संस्थेनं हृदयरोग, कॅन्सर, यांसारख्या 500 ऑपरेशन्सना आर्थिक मदत केली आहे. 5 आदिवासी गावे, 7 शहरी वस्त्या दत्तक घेवून 2 लाख पेशंटपर्यंत आरोग्यसेवा नेली.

पूर, भूकंप अशा आपत्तीतही संस्थेची औषधे पोहोचलीत. महिन्याला फक्त 10 रुपये… कामगारांच्या एवढ्या मदतीवर हे लाखमोलाचे काम उभे राहिले आहे.

मानव सेवा केंद्राला जर तुम्हाला काही मदत करायची असेल, तर ती आर्थिक स्वरुपात किंवा औषधे, मेडिकल किट देऊन तुम्ही करु शकता. मेडिकल व्हॉलिंटीअर म्हणूनही तुम्ही संस्थेच्या कामात सहभागी होऊ शकता…

तुमचे ड्राफ्ट / चेक या पत्त्यावर पाठवा…

पत्ता : मानव सेवा केंद्रमायको एम्लॉईज फोरमसिंहस्थ नगर, सिडको नाशिक : 422008फोन नंबर : 0253-2377239

close