स्टेडियमचा दर्जा आंतरराष्ट्रीय असल्याचा दावा

September 13, 2010 1:14 PM0 commentsViews: 7

दिग्विजय सिंग देवो, नवी दिल्ली

13 सप्टेंबर

कॉमनवेल्थ स्पर्धेनिमित्त बांधण्यात आलेली स्टेडियम्स सुमार दर्जाची बांधली गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र स्पर्धेच्या आयोजन समितीने ही स्टेडियम्स आंतरराष्ट्रीय दर्जाची झाल्याचे सांगितले आहे.

कॉमनवेल्थसाठी तालकटोर स्टेडियम पूर्णपणे सज्ज आहे. याच स्टेडियमवर या वर्षाच्या सुरूवातीला बॉक्सिंग कॉमनवेल्थ चॅम्पियन्सशिपचे यशस्वीपणे आयोजन केले गेले होते. अगदी थोड्या अवधीतही येथे सहजपणे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करता येऊ शकते. खर्‍या अर्थाने कॉमवेल्थची भव्यता या स्टेडियममुळे लक्षात येऊ शकते.

पण श्यामाप्रसाद मुखर्जी स्वीमिंग कॉम्प्लेक्सबद्दल मात्र असे सांगता येणार नाही. बांधकामासाठीची डेडलाईन पाळण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली होती. स्वीमिंग पूल बघायला जरी सुंदर दिसत असला, तरी फिनिशिंगच्या दर्जाबाबत साशंकता कायम आहे. विशेषत: डायव्हिंग प्रकारात खेळाडूंचे कौशल्य आणि सहनशिलता पणास लागणार आहे. डायव्हिंग फ्लॅटफॉर्मसाठी लिफ्ट नाही.

येथली त्यागराज स्टेडियम पाहिल्यावर थोडसे हायसे वाटते.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्टेडियममध्ये नेटबॉलचा खेळ रंगणार आहे. सिरी फोर्ट कॉम्लेक्समधील स्क्वॉश कोर्टचे बांधकाम जबरदस्त आहे. या फिरत्या कोर्टमध्ये फायबरग्लासचा वापर केला गेला आहे. आणि दुसरीकडे असलेल्या बॅडमिंटन कोर्टला आता प्रतीक्षा आहे, ती फक्त खेळाडूंची.

close