आशियातील उंच गणेश मूर्ती कोल्हापुरात

September 13, 2010 1:31 PM0 commentsViews: 81

13 सप्टेंबर

प्रताप नाईक, कोल्हापूर

आशिया खंडातील सर्वात उंच गणेश मूर्ती कोल्हापूर जिल्ह्यातील टोप संभापूर इथे आहे. चिन्मय सेवा ट्रस्टने ही मूर्ती उभारली आहे. या मूर्तीचे वजन आहे, तब्बल 800 टन.

कोल्हापूर शहरापासून 14 किलोमीटरवर असणार्‍या चिन्मय सेवा ट्रस्टने उभारलेल्या या चिन्मय गणेशाची उंची आहे, तब्बल 85 फूट. देणगीदारांच्या मदतीतून ी गणेशाची मूर्ती उभारण्यात आली आहे.

कर्नाटकातील शिल्पकाराच्या मार्गदर्शनाखाली 50 कुशल कामगारांनी अथक परिश्रमातून ही सुबक मूर्ती तयार केली आहे. मूर्तीच्या गर्भगृहात 24 फूट उंचीचे ध्यानालय आहे. त्यात चिन्मयानंद यांचे जीवनदर्शन घडवणारे चित्र प्रदर्शन आहे.

नागावर आरुढ असणार्‍या मूर्तीला पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून हजेरी लावतात. 85 फुटांची ही मूर्ती आशिया खंडातील सर्वात उंच मानली जाते.

close