लोकल अपघातातील मृतदेहांकडे दुर्लक्ष

September 13, 2010 1:39 PM0 commentsViews: 2

13 सप्टेंबर

मुंबईत दररोज लोकलमधून अनेक जणांचा पडून मृत्यू होतो. अनेक मृतदेहांचा ओळख पटते तर काहींची शेवटपर्यंत ओळख पटत नाही.

ट्रॅकच्या जवळ असे मृतदेह पडलेली दृश्ये तशी मुंबईकरांसाठी नवी नाहीत. कांजूर रेल्वेस्टेशनजवळ आज असाच प्रकार घडला. पण धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहावरुन तब्बल चार लोकल गेल्या तरीही रेल्वे पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. अखेर 'आयबीएन-लोकमत'ची टीम तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह उचलला.

close