मंदीमुळे दिवाळी ऑफर्सवर परिणाम

October 26, 2008 3:08 PM0 commentsViews: 7

26 ऑक्टोबर, मुंबई यंदाच्या दिवाळीत कंपन्यांकडून मिळणारी ऑफर्सची खैरात कमी झाली आहे. त्यामुळं मंदीच्या काळात बाजारातही फारशी गर्दी दिसत नाही पण तरीही होम डेकोर आणि लक्झुरी वस्तूंच्या खरेदी करण्याकडे लोकांचा कल दिसतो. त्यामुळं होम डेकोर कंपन्यांनी नव्या ऑफर्सही दिल्या आहेत. यंदाच्या दिवाळीत टी.व्ही, फ्रिज या घरगुती वस्तुंच्या खरेदीवर ग्राहकांना चांगल्या ऑफर्स मिळू शकणार नाहीत. पण जर तुम्ही हाय-एन्ड घड्याळ किंवा फर्निचर घेणार असाल तर त्यावर तुम्हाला आकर्षक ऑफर्स मिळतील. 31 ऑक्टोबरपर्यंत ही ऑफर्स लागू आहे. त्याशिवाय, हाय-एंड स्टोअर एथोसमध्ये दहा हजारांच्या घड्याळ्याच्या खरेदीवर एक स्विस घड्याळ खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी दुकानात गर्दी होत आहे. अशा प्रकारच्या सेल्स प्रमोशनमुळं 20 ते 30 टक्क्यांपेक्षा जास्त विक्री होण्याची शक्यता आहे.

close