मनसे कार्यकर्त्यांचा नागपुरात राडा

September 13, 2010 4:33 PM0 commentsViews: 1

13 सप्टेंबर

शहरातील अस्वच्छता आणि रस्त्यावरील खड्डयांचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी आज नागपूर महापालिकेत राडा केला.

त्यांनी महापालिकेचे उपअभियंता कृष्णकुमार हेडावू यांच्या ऑफिसमध्ये तोडफोड केली. तसेच या कार्यकर्त्यांनी कृष्णकुमार यांनी सडलेला भाजीपालाही भेट दिला.

नागपूरच्या नंदनवन झोपडपट्टी भागात सर्वत्र घाण पसरली आहे. गटारे उघड्यावर आहेत. तर पावसामुळे रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत.

वारंवार महापालिकेला विनंती करुनही पालिकेने याची दखल घेतली नाही. याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे.

close