खराब रस्त्यांना टोल नाही

September 14, 2010 12:30 PM0 commentsViews: 4

14 सप्टेंबर

टोलवसुली विरोधात राज्यात आंदोलन उभे राहिले असतानाच आता सरकारने रस्ते चांगले नसतील तर टोल घेतला जाणार नाही, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली आहे.

पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असला, तरी लवकरच त्याची औपचारिक घोषणा केली जाणार असल्याचेही आर. आर.पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

close