अण्णा राज्यपालांच्या भेटीला

September 14, 2010 12:36 PM0 commentsViews: 1

14 सप्टेंबर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज राज्यपाल शंकरनारायणन यांची सदिच्छा भेट घेतली. राळेगणला भेट देण्याचे आमंत्रण आपण राज्यपालांना दिले, अशी माहिती अण्णा हजारेंनी दिली.

राज्यपालांनीही केरळमध्ये ग्रामविकासाचे काम केले आहे. त्याविषयीही चर्चा झाल्याची माहिती अण्णांनी दिली.

आरटीआय कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले ही गंभीर बाब आहे, लोकांनीही अधिक जागृती दाखवली पाहिजे, आज दुसर्‍या स्वातंत्र्य चळवळीची गरज आहे, असे मत अण्णांनी व्यक्त केले आहे.

close