नव्या प्रकल्पांना रेड सिग्नल

September 14, 2010 12:44 PM0 commentsViews: 6

14 सप्टेंबर

राज्यातील सात औद्योगिक क्षेत्रात नव्या प्रकल्पांना परवानगी देणार नाही, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे. ते नागपुरात बोलत होते.

यामध्ये त्यांनी नवी मुंबईचेही नाव घेतल्याने नवीन विमानतळाचे अस्तित्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रदूषणाचे प्रमाण सगळ्यात जास्त असणार्‍या 88 औद्योगिक क्षेत्रांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

यातील 43 अतिप्रदूषित क्षेत्रांमध्ये चंद्रपूर चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत डोंबिवली 14व्या, औरंगाबाद 17व्या तर नवी मुंबई 30व्या क्रमांकावर आहे. नागपूरची नोंद ही 36 व्या, तर नाशिक शहर, चेंबूर 45 आणि 46 व्या क्रमांकावर आहेत.

close