एल्फिस्टन विद्यालयासाठी शिवसेनेचे आंदोलन

September 14, 2010 12:57 PM0 commentsViews: 2

14 सप्टेंबर

राज्यात नवीन मराठी शाळांना सरकार परवानगी देत नाही. तर दुसरीकडे मराठी शाळांच्या दुरवस्थेकडेही सरकार लक्ष देत नसल्याचे दिसत आहे.

मुंबईत 145 वर्ष जुने एल्फिस्टन तंत्र विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजची दुरवस्था झाली आहे. याविरोधात आज शिवसेनेने आंदोलन केले.

शाळेची दुरवस्था आणि दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या या सगळ्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

close