शाहरुख आणि काजोलचा पावसातला क्षण माझ्यासाठी स्पेशल- करण जोहर

October 26, 2008 3:17 PM0 commentsViews: 10

26 ऑक्टोबर, लंडनकरण जोहरनं दिग्दशिर्त केलेल्या ' कुछ कुछ होता है ' ला प्रदशिर्त होऊन 10 वर्ष झाली आहेत. हा सिनेमा केवळ बॉक्स ऑफीसच नाही तर लंडनमध्येसुद्धा रेकॉर्ड ब्रेक व्यवसाय केलेला करणचा हा पहिलावहिला सिनेमा होता. करणला दिग्दर्शक म्हणून लाँच करणारा सिनेमा ' कुछ कुछ होता है ' नं लंडनमध्ये यशाची दहा वर्ष साजरी केली. ऑक्टोबर 1998 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमानं अनेक रेकॉर्डस बनवले. नवे ट्रेन्ड सेट केलेच, शिवाय बॉलिवुडला नवा लुक दिला. लंडनमध्ये या सिनेमानं सुमारे लाखांपेक्षा जास्त बिझनेस केला. ज्यानं आतापर्यंतच्या हिंदी सिनेमाचे रेकॉर्डस ब्रेक केलेत. ' मला वाटतं लोकांना या सिनेमातला परदेसी ढंगाचा देसी आत्मा जास्त भावला असेल. दिलवाले आणि ' कुछ कुछ होता है ' मधून प्रेक्षकांना नेमकं हेच पहायला मिळालं' ,असं करण जोहर चित्रपटाबद्दल म्हणाला.आता 10 वर्षांनंतरसुद्धा लंडनवासी अजुनही या सिनेमाच्या प्रेमात आहेत, असं दिसतंय.या सिनेमाशी प्रेक्षकांच्या जशा आठवणी आहेत तसंच दिग्दर्शक करणचीही एक स्पेशल आठवण आहे. ' शाहरुख आणि काजोल पावसात भिजत एकमेकांना भेटतात तो क्षण मला पूर्ण सिनेमातला खूप स्पेशल वाटतो',असं चाहत्यांच्या गराड्यातील करण सांगत होता.

close