बिलालला आठवड्याची पोलीस कोठडी

September 14, 2010 1:03 PM0 commentsViews: 1

14 सप्टेंबर

पुणे जर्मन बेकरीतल्या बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी लालबाबा शेख उर्फ बिलालला आज नाशिक कोर्टासमोर हजर करण्यात आले.

कोर्टाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बिलाल अनेक खोट्या नावांनी नाशिक परिसरात वावरत होता. इतकेच नाही, तर त्याने खोट्या नावाने बरीच कागदपत्रेही तयार केली आहेत.

अमीर अनिक पारीख या नावाने त्याचे ड्रायव्हींग लायसन आहे. तर इक्बाल मुनीर सुतार या नावाने डोमीसाईल सर्टिफिकेट. बिलालला ओळखपत्र दिल्याप्रकरणी आता नाशिकचे नगरसेवक दिनकर पाटील यांचीही चौकशी एटीएस करणार आहे.

close