पाणीपुरवठ्यासाठी मनसेचे आंदोलन

September 14, 2010 1:08 PM0 commentsViews: 2

14 सप्टेंबर

इंजीनिअरच्या गळ्यात पाण्याच्या बाटल्यांचा हार घालत, आज कल्याण डोंबिवली नगरपालिकेत मनसे कार्यकर्त्यांनी विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात आंदोलन केले.

नगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता उदय सूर्यवंशी यांच्या गळ्यात या आंदोलकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा हार घालून निषेध केला.

गेल्या चार दिवसांपासून खडपाडा भागातील साई चौकात पाणी पुरवठा होत नसल्याचा मनसेने आरोप केला आहे.

close