गौराई आल्या तळकोकणात

September 14, 2010 1:35 PM0 commentsViews: 117

14 सप्टेंबर

तळकोकणातही आज गौरींचे उत्साहात आगमन झाले. सासुरवाशीण गौरीचा मुखवटा घेऊन आणि पाच प्रकारच्या नवीन वनस्पती घेऊन विहिरीवर जातात.

त्या ठिकाणी गौरीच्या मुखवट्याचे पूजन केले जाते. तिला नैवेद्य दाखवला जातो. आणि सात चुळी तोंडात घेऊन गौरीला वाजत गाजत मुख्य मांडवावर आणले जाते.

उद्या गौरी पूजन आहे. सर्वांना सुखी ठेवत मनोकामना पूर्ण करण्याचे साकडे गौरींना घालण्यात येते. भिरवंडे गावात आजही ही प्रथा जपली जाते.

close