मैदाने वाचवण्यासाठी महापालिकेचे नवे धोरण

September 14, 2010 1:37 PM0 commentsViews: 6

14 सप्टेंबर

मुंबईत सध्या मोजकीच मैदाने उरली आहेत. ही उरलेली मैदाने वाचवण्यासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. यासाठी पालिका नवे धोरण तयार करणार आहे.

यात नागरिकांचा सक्रीय सहभाग असेल. आपल्या परिसरात किती मोकळी जागा असावी, हे ठरविण्याचा अधिकार सोसायटीतील नागरिकांना मिळणार आहे.

मैदान जर बिल्डरला देण्याचा घाट घातला जात असेल आणि नागरिकांचा विरोध असेल, तर तो प्रस्ताव रद्द होईल, अशीही तरतूद या नव्या धोरणात राहणार आहे.

मुंबईतील अनेक मैदाने ही खासगी विकासकांना दिल्यानंतर त्यांचा वापर त्यांनी सार्वजनिक कामांसाठी न करता खासगी कामासाठी केला.

या सगळ्या गैरव्यवहाराला आता या नव्या धोरणामुळे चाप बसणार आहे.

close