विसर्जनापूर्वी बुजवणार खड्डे

September 14, 2010 1:41 PM0 commentsViews: 2

14 सप्टेंबर

मुंबईतील खड्‌ड्यांची बरीच चर्चा झाल्यानंतर आता हे खड्डे विसर्जनापूर्वी बुजवण्याची घोषणा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मुंबईतील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या खड्‌ड्यांचा त्रास सामान्य मुंबईकरांना तर सहन करावा लागत होताच.

पण गणेश उत्सवात श्री गणेशाच्या मूर्ती मंडपात आणताना बर्‍याच गणेश भक्तांना याचा फटका बसला होता.

हे सर्व रस्त्यावर पडलेले खड्डे लवकर बुजवले जातील, असे पालिकेने सांगितले होते.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईतील खड्‌ड्यांचा आढावा घेतला.

त्यावेळी गणेशविसर्जनापूर्वी सर्व खड्डे बुजवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

close