अब्दुलांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी

September 14, 2010 1:46 PM0 commentsViews: 1

14 सप्टेंबर

जम्मू काश्मीरमधील ओमर अब्दुल्लांचे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी आज भाजपने केली. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अनंतकुमार यांनी मुंबईत ही मागणी केली.

मुंबईत सध्या भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना अनंतकुमार यांनी ही मागणी केली.

काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराकडे बघता लष्कराला अधिक अधिकार दिले पाहिजेत. त्याऐवजी, केंद्र सरकार ते कमी करण्याचा विचार करत आहे, हे चुकीचे आहे, अशी टीकाही भाजपने केली आहे.

त्याच वेळी भाजप युवा मोर्चाने संपूर्ण देशात सेव्ह काश्मीर हे अभियानही राबवायचे ठरवल्याची माहिती युवा मोर्चाचे प्रमुख अनुराग त्रिपाठी यांनी दिली आहे.

close