रिलायन्सच्या वीज दरवाढीला शिवसेनेचा विरोध

September 14, 2010 2:37 PM0 commentsViews: 2

14 सप्टेंबर

एमईआरसीने रिलायन्सला वीज दरवाढीची मुभा दिल्यानंतर रिलायन्सने लगेचच दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.याचा फटका सुमारे 30 लाख ग्राहकांना बसणार आहे. पण आता शिवसेनेने या दरवाढीला विरोध केला आहे. वीज दरवाढीविरोधात वेळ पडल्यास पुन्हा उग्र आंदोलनाचा इशारा उध्दव ठाकरेंनी दिला आहे.

गेल्या वर्षी रिलायन्सच्या वीजदरवाढीविरोधात शिवसेना आणि मनसे रस्त्यावर उतरली होती. सरकारकडे दोन्ही पक्षांनी रिलायन्सच्या वीज दरवाढीला स्थगिती देण्याचे निर्देश देण्यास भाग पाडले होते. स्थगितीचे निर्देश देत रिलायन्सच्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्याच्या सूचनाही एमईआरसीला सरकारने केल्या होत्या.

त्यानुसार हैदराबादच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेजला चौकशी करण्यास सांगितले होते. साधारणत: वर्षभराच्या चौकशीनंतर स्टाफ कॉलेजने एमईआरसीला अहवाल सादर केला. त्यात रिलायन्सला क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यामुळे एमईआरसीने गेल्या वर्षी रिलायन्सच्या दरवाढीला दिलेली स्थगिती उठवली आहे.

close