टाटाच्या वीज ग्राहकांना दिलासा

September 14, 2010 4:36 PM0 commentsViews: 4

14 सप्टेंबर

एकीकडे रिलायन्सच्या सुमारे 30 लाख ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसला आहे. दुसरीकडे बेस्ट आणि टाटाच्या ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

बेस्ट आणि टाटा पॉवरने वीजदर कमी करण्याचे आदेश वीज नियामक आयोग म्हणजेच एमईआरसीने दिलेत. त्यानुसार बेस्टने आपले वीज दर 15 टक्क्यांनी कमी केले आहेत.

तर टाटा पॉवरनेही 7 ते 15 टक्के दरकपात केली आहे. नवीन दर 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.

close