काश्मीरमधील परिस्थिती गंभीरच

September 14, 2010 5:10 PM0 commentsViews:

14 सप्टेंबर

काश्मीरमधील परिस्थिती आजही गंभीर आहे. दिवसभर पूर्ण काश्मीर खो-यात कर्फ्यू असल्यामुळे निदर्शने झाली नाहीत. पण काल जखमी झालेल्या चौघांचा आज मृत्यू झाला.

त्यामुळे गेल्या दोन दिवसांत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 17 वर गेली आहे. अतिशय तंग वातावरण असल्यामुळे श्रीनगर विमानतळ बंद करण्यात आले. वृत्तपत्र आणि स्थानिक चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी आज दिवसभर अनेक बैठका घेतल्या. आपण राजीनामा देणार नाही, हेही त्यांनी आज स्पष्ट केले. राजधानी दिल्लीतही उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीआधी वातावरण तापले आहे.

केंद्र सरकारने ओमर अब्दुल्लांच्या सरकारवर खापर फोडत मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले. तर काल ओमर अब्दुल्लांचा राजीनामा मागणार्‍या भाजपने आज केंद्र सरकारवरही टीकास्त्र सोडले.

काश्मीर खोर्‍यात काय चालले आहे याची केंद्र सरकारला साधी कल्पनाही नाही, या शब्दांत लालकृष्ण अडवाणींनी टीका केली आहे.

close