लालबागच्या राजाच्या चरणी 1 कोटी 28 लाख रुपये

September 14, 2010 5:34 PM0 commentsViews: 7

14 सप्टेंबर

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता गर्दी वाढू लागली आहे.

चारच दिवसांत राजाच्या चरणी भक्तांनी 1 कोटी 28 लाख रुपये अर्पण केले आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी भाविक कोट्यावधी रुपये अर्पण करत आहेत.

गेल्या वर्षी 11 दिवसांत भाविकांनी लालबागच्या राजाला अर्पण केलेली रक्कम होती 5 कोटी रुपये.

यंदा ही रक्कम 6 कोटी रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज मंडळाने व्यक्त केला आहे.

close