ललित मोदींना कोर्टाने पुन्हा फटकारले

September 15, 2010 8:37 AM0 commentsViews: 6

15 सप्टेंबर

ललित मोदींना हाय कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले आहे. मोदींची चौकशी करण्यासाठी आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने एक त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती.

त्यात चिरायू अमीन, अरुण जेटली आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांची त्यात वर्णी लागली होती. पण या चौकशी समितीतून अमीन आणि जेटलींना हलवण्याची मागणी मोदींनी याअगोदर केली होती.

पण बीसीसीआयने ही मागणी नाकारली होती. त्यामुळे मोदींनी याविरोधात हाय कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. पण आज कोर्टाने ही याचिका फेटाळून मोदींना पुन्हा एक चपराक दिली आहे.

close