सोने पोहोचले 20 हजारांवर

September 15, 2010 8:46 AM0 commentsViews: 6

15 सप्टेंबर

सोन्याच्या दराने आता 20 हजारांचा टप्पा पार केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर आज 1 हजार 270 पॉईंट 30 डॉलर्सवर पोहचला आहे.

रुपयांमध्ये हा दर 19 हजार 499 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. आतापर्यंतचा आंतराष्ट्रीय मार्केटमध्ये सर्वाधिक दर 1274.47 डॉलर्स इतका आहे. रुपयांमध्ये हा दर 19 हजार 563 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.

गणेशोत्सव आणि त्यानंतर सुरु होणार्‍या सणांच्या दिवसांत सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असते. त्यामुळे दर 20 हजारांच्यावर गेला आहे.

यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाल्यानं लोकांच्या खरेदी क्षमतेत वाढ झाली आहे. सोन्याच्या दुकानात सोन्याची नाणी आणि वळी यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

close