पुण्यातील ट्रॅफिकची माहिती इंटरनेटवर

September 15, 2010 8:54 AM0 commentsViews: 8

15 सप्टेंबर

पुण्यातील ट्रॅफिक जामला वैतागलेल्या पुणेकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. एका क्लिकवर इंटरनेटच्या माध्यमातून कोणकोणत्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम आहे, त्याचबरोबर या वाहतूक कोंडीचे कारण काय? तसेच कुठल्या पर्यायी रस्त्याने अपेक्षित ठिकाणी पोचता येईल, ही सर्व उपयुक्त माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे.

यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान ही वेबसाईट सुरू झाली असून गणपती विसर्जनाच्या वेळी कोणते रस्ते वाहतूकीसाठी खुले आहेत बंद आहेत हेसुध्दा यातून समजणार आहे. काही काळानंतर मोबाईलवरदेखील पुण्याच्या ट्रॅफिकची सर्व माहिती मिळणार आहे.

या वेबसाईटसाठी कानपूर आयआयटीच्या दोन इंजीनिअर्सची मदत घेण्यात आली आहे. पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी प्रात्यक्षिक दाखवून या अभिनव उपक्रमाची माहिती पत्रकारांना दिली. www.punepolice.gov.in या वेबसाईटवर आपल्याला ही माहिती मिळणार आहे.

close