वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प सुरू होणार

September 15, 2010 3:06 PM0 commentsViews: 7

15 सप्टेंबर

मुंबई वॉटर ट्रान्सपोर्ट वेस्टर्न विभागाचा गेले 10 वर्ष रखडलेला प्रकल्प आता सुरु होण्याची शक्यता आहे. प्रतिभा इन्फ्रास्ट्रक्चर या एकाच कंपनीने वेस्टर्न वॉटर ट्रान्सपोर्टसाठी बिडिंग केले होते.

त्याला सत्यगिरी शिपिंग कंपनीने आव्हान दिले होते. त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. केवळ एकाच कंपनीने बिडिंग केले असेल तर ते रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यात केली गेली होती. कारण एका बिडिंगला मान्यता देणे म्हणजे केंद्रीय दक्षता समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होते, अशी मागणी सत्यगिरी शिपिंग कंपनीने केली होती.

मात्र सत्यगिरीने या प्रकल्पासाठी बिडिंग केलेले नाही, त्यामुळे त्या प्रक्रियेला आव्हान देण्याचा अधिकार त्यांना नाही. असे सांगून हायकोर्टाने ही गाजलेली याचिका अखेर निकालात काढली. तसेच मुंबईमध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टची गरज मोठ्या प्रमाणात असल्याचे नमूद केले.

नव्याने बिडिंग करुन वेळ वाया जाईल, आणि केवळ एकाच कंपनीने बीडिंग केल्यामुळे नियमाचा भंग होत नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पाचे काम एमएसआरडीसीतर्फे पाहिले जात आहे.

close