वीज दरवाढी विरोधात शिवसेनेचे निवेदन

September 15, 2010 5:20 PM0 commentsViews: 5

15 सप्टेंबर

रिलायन्सच्या वीज दरवाढीविरोधात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उर्जा मंत्रालयाकडे आज एक निवेदन दिले आहे.

ही दरवाढ कमी न केल्यास त्याचा सर्वाधिक फटका गरीब जनतेला बसणार आहे, असं सांगत या पत्रात मुंबईत वीज वितरण करणार्‍या चारही कंपन्यांचे दर समान असावेत, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.

सरकार मुंबईतील वीज दरवाढीबाबत गंभीर नाही, असे सांगत त्यांनी रिलायन्सच्या नफेखोरीवरही टीका केली आहे.

ऊर्जा मंत्री अजित पवार यांची भेट न झाल्याने शिवसेनेने हे निवेदन ऊर्जा सचिवांकडे दिले आहे.

close