डीएमके युपीए सरकारला अडचणीत आणणार नाही – एन. करुणानिधी

October 27, 2008 7:17 AM0 commentsViews: 2

27 ऑक्टोबर, तामिळनाडू -श्रीलंकेतील तामिळी नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या डीएमकेला एक पाऊल मागे घेण्यास केंद्रानं राजी केलं आहे. याप्रश्नावर परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांची भेट घेतली.श्रीलंकेत राहत असणार्‍या तामिळी नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्या मुद्यावरुन डीएमके सरकार आक्रमक झालं होतं. श्रीलंकेतील तमीळ नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन डीएमकेच्या खासदारांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. त्यासंदर्भात प्रणव मुखर्जी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एन. करुणानिधी यांची भेट घेतली. युपीए सरकारला डीएमके अडचणीत आणणार नाही,' असं आश्वासन करुणानिधी यांनी मुखर्जी यांना दिलं आहे तर केंद्रातर्फे श्रीलंकेतील तमीळ नागरिकांच्या मदतीकरता एक समिती स्थापन करण्यात आली असून श्रीलंका सरकारनंही मदतीचं आश्वासन दिल्याची माहिती मुखर्जी यांनी यावेळी दिली आहे.

close