पुण्यात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना विशेष अधिकार

September 16, 2010 10:16 AM0 commentsViews: 4

16 सप्टेंबर

पुणे शहरावर दहशतवादाचे सावट अजूनही कायम आहे. याचा परिणाम पुण्यातील गणेशउत्सवावर होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी नागरिकांची मदत घ्यायचे ठरवले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पिपंरी – पोलिसांनी तब्बल एक हजार विद्यार्थ्यांना विशेष अधिकार दिले आहेत. विद्यार्थी किंवा नागरिकांना काही मर्यादीत वेळेपर्यंत, पोलीस अधिकार्‍यांचे सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या या अधिकारानुसार, या काळात जर काही गुन्हा घडला किंवा घडत असेल तर हे विद्यार्थी गुन्हेगारांना अटक करु शकतात.

गुन्हा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गुन्हा रोखण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांच्या मदतीने बळाचाही वापर ते करू शकतात. नागरिकांची मदत घेऊन पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला आहे.

close