राहुल ओमरच्या पाठीशी

September 16, 2010 10:51 AM0 commentsViews:

16 सप्टेंबर

काश्मीरमध्ये सद्य परिस्थितीत ओमर यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.

काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी, काल झालेली सर्वपक्षीय बैठक कुठल्याही ठोस निर्णयाशिवायच संपली. लष्कराचा विशेषाधिकार काढण्यावर एकमत झाले नाही.

त्यामुळे हा निर्णय पुन्हा लांबणीवर टाकण्यात आला आहे. काश्मीरमधील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी, एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पण काश्मीरमधील फुटीरवाद्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. शिष्टमंडळ पाठवणे हे वेळकाढू धोरण असल्याची टीका फुटीरवादी नेत्यांनी केली आहे.

राहुल गांधींनी मात्र ओमर अब्दुल्ला यांना पाठींबा दिला आहे.

close