आज गौरी विसर्जन

September 16, 2010 10:55 AM0 commentsViews: 130

16 सप्टेंबर

आज गौरी विसर्जनाचा दिवस आहे. गणपतीच्या तिसर्‍या दिवशी गौरी म्हणजे माहेरवाशिण घरी येते असा समज आहे.

गौरी साधारणपणे 3 दिवस असतात. पहिला दिवस आगमनाचा, दुसरा पूजनाचा आणि तिसरा विसर्जनाचा. गौरींचे विसर्जन जिथे केले जाते, त्या नदी तलावातील काही दगड आणून ते घरी ठेवण्याची पद्धत आहे.

सुखसमृद्धी आणि पिकांची भरघोस वाढ व्हावी, ही त्यामागची श्रद्धा आहे.

close