अंगणवाडीतील व्हिटॅमिन सिरपमध्ये बुरशी

September 16, 2010 10:38 AM0 commentsViews: 4

16 सप्टेंबर

अक्कलकुवा तालुक्यातील अंगणवाडीच्या बालकांना पुरवण्यात आलेल्या व्हिटॅमिन सिरपच्या औषधांमध्ये बुरशीयुक्त पदार्थ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या औषधाच्या बाटल्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत व्हिटामेक्स मल्टीव्हिटामिन सिरपच्या बाटल्यांचे अंगणवाडीच्या बालकांना वाटप करण्यात आले होते. पण या बाटल्यांमध्ये बुरशीयुक्त पदार्थ आढळून आला. त्यामुळे या औषधंाचा पुरवठा करणार्‍या कंपन्यांची चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती आमशा पडवी यांनी केली आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील 445 अंगणवाडीच्या 35 हजार बालकांना सुमारे 40 हजार व्हिटॅमिनच्या बाटल्या पुरवल्या होत्या. परंतू बाल विकास प्रकल्प अधिकारी आर. एस. मराठे यांना औषध खराब असल्याचे समजताच त्यांनी हे वाटप रोखण्यास सांगितले.

close