थ्री डी बाप्पांकडून जनजागृती

September 16, 2010 11:20 AM0 commentsViews: 6

चंद्रकांत हंचाटे, पुणे16 सप्टेंबर

आज प्रत्येक गोष्ट 'ऍडव्हान्स' होत असताना गणपती बाप्पा तरी मागे कसे राहतील?पुण्याच्या इ – पिंक डीजिटल कंपनीने गणपतीची विविध रुपे थ्रीडी रुपात साकारली आहेत. या विविध रुपात गणपती बाप्पा सामाजिक जनजागृती करणार आहे…

इ पिंक या डिजीटल कंपनीची टीम गेल्या दोन महिन्यांपासून यासाठी कामात व्यस्त आहे. या मंडळींनी थ्री डी ऍनिमेशनचा वापर करुन गणपती बाप्पाला 75 रुपात साकारले आहे.

या प्रोजेक्टमध्ये गणपती बाप्पा लोकांना सामाजिक, पर्यावरणविषयक संदेश देताना दिसतात. पाणी वाचवा, अतिरेकी हल्ल्यांना एकजुटीने तोंड द्या, असे सामाजिक भान जपणारे संदेशही या ऍनिमेशनमध्ये द्यायला बाप्पा विसरत नाही.

गणेशोत्सवाच्या दरम्यान सामाजिक संदेश देणारे हे ऍनिमेशन आता अनेक शहरांत प्रसिद्ध होऊ लागले आहे.

close