बट्ट यांनी घेतली पवारांची भेट

September 16, 2010 11:43 AM0 commentsViews: 1

16 सप्टेंबर

पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इजाझ बट्ट यांनी आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांची नवी दिल्ली इथे आज भेट घेतली. चर्चेचा मुख्य मुद्दा अर्थातच स्पॉट फिक्सिंग प्रकरण आणि तीन पाक खेळाडूंवर आयसीसीने लादलेली बंदी हा होता.

त्याशिवाय भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सीरिज पुन्हा सुरु करता येईल का, यावर त्यांनी चर्चा केली. तसेच भारतीय उपखंडात पुढच्या वर्षी होणार्‍या वन डे वर्ल्डकपबद्दल बट्ट यांनी चौकशी केली.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाक खेळाडूंची चौकशी सुरू असून ही चौकशी संपल्यानंतरच त्याबाबत कारवाई करण्यात येईल, असेही इजाझ बट्ट यांनी सांगितले.

ही चौकशी संपल्यानंतर स्कॉटलंड यार्डचे पोलीस या खेळाडूंना आपल्या देशात जाऊ देतील असेही ते म्हणाले.

close