काँग्रेस भवनात लावणीचा बार

September 16, 2010 11:49 AM0 commentsViews: 1

16 सप्टेंबर

पुण्यातील काँग्रेस भवन पुन्हा एकदा वादात सापडले आहे. यावेळी निमित्त ठरले आहे ते काँग्रेस भवनात सुरू असलेली लावणी – बावनखणी या कार्यक्रमाची रिहर्सल.

काँग्रेस भवनासारख्या ऐतिहासिक वास्तूत लावणीच्या कार्यक्रमाची प्रॅक्टीस करण्यास आक्षेप घेतला आहे, काँग्रेसच्याच अनंत गाडगीळ यांनी.

पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात 'लावणी बावनखणी' हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

अनंत गाडगीळ आणि सुरेश कलमाडींचे राजकीय मतभेद सर्वश्रुत असल्यामुळे या लावणीच्या रिहर्सलच्या मुद्द्यावरुन आता नवा वाद रंगणार आहे.

close