कोल्हापुरात गौरी-गणपतींचे विसर्जन

September 16, 2010 11:54 AM0 commentsViews: 100

16 सप्टेंबर

कोल्हापुरात घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन मोठ्या भक्ती भावाने झाले. 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात भक्त आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत.

रंकाळ्यावर महानगरपालिकेने तयार केलेल्या विसर्जन कुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर अनेक भक्त जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशाची मूर्ती दान करत आहेत.

दुसरीकडे पंचगंगा नदीमध्येही गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. त्यासाठी पंचगंगा घाटावर भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी अग्निशमन दल आणि व्हाईट आर्मीचे कार्यकर्ते या ठिकाणी सज्ज आहेत.

close