नवी मुंबईत विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही

September 16, 2010 12:32 PM0 commentsViews: 5

16 सप्टेंबर

गणरायांची विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विसर्जनाच्या मार्गावर 100 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

नवी मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या 100 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा कंट्रोलरुम नवी मुंबई पोलीस कमिशनर ऑफीसमध्ये असणार आहे.

पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, ट्राफीक कंट्रोल रुम अशा आठ ठिकाणी सपोर्टिव्ह कंट्रोल रुम उभारण्यात आल्या आहेत.

सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या पाहणीवरुन अचानक पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पाठवण्यासाठी पोलीस फोर्स तयार करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.

close