खड्‌ड्यांच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांचीही उडी

September 17, 2010 11:05 AM0 commentsViews:

17 सप्टेंबर

टोल वसुलीच्या मुद्यावरून सर्वच नेत्यांची टोलवाटोलवी अजूनही सुरूच आहे. आता तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही त्यात उडी घेतली आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजवल्याशिवाय टोल वसूल केला जाऊ नये, असे मत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

त्यासाठी आदेशही काढले आहेत, असेही ते म्हणाले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. गेले चार महिने नागरिकांना खड्‌ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

तर आता पावसाळा संपत आला असताना सरकारला जाग का आली, असा सवाल आता जनतेकडून विचारण्यात येत आहे.

close